चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पातील कृषी व सहकार या खंडाचे प्रकाशन लवकरच होत आहे. सदर खंड प्रकाशन पूर्व सवलतीत आमच्या मुंबई आणि पुणे कार्यालयात उपलब्ध आहे. मूळ किंमत ९०० रु. सवलतीत ७०० रुपयात उपलब्ध. दृश्य कला खंडही प्रकशित होण्याच्या मार्गावर. मूळ किंमत ९०० रु. सवलतीत ७०० रु. विद्यार्थ्यांना ६०० रु. ओळखपत्र आवशक.

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारत जगातील महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आव्हान केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्या आव्हानाचे स्वरुप जागतिक बनले आहे. भारतातील एक अग्रेसर राज्य म्हणून जगात महाराष्ट्राला आपली भूमिका वठवायची नवी संधी चालून आलेली आहे. एकेकाळी सारा देश गुलामीत जखडला असताना शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि भीमथडीची मराठी तट्टे अटकेपार जाउन पोचली. आज तंत्रविज्ञानाच्या, उद्योगव्यापाराच्या बळावर जागतिक बाजारपेठ जिंकण्याचे आव्हान महाराष्ट्रापुढे आहे.
खर्‍या अर्थाने ’गर्जा महाराष्ट्र् माझा’ या ओळी सार्थ करायच्या असतील, तर महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला आवाहन करावे लागेल. ते आवाहन करणार्‍या महाराष्ट्र नायकांची ही कर्तृत्वेश्वरी.

’राकट देशा, कणखर देशा’ या ओळींसोबत ’सुंदर देशा, संपन्न देशा,सुवर्णमय देशा’ या नव्या ओळींना जोडण्याची आस निर्माण करणारा ’महाराष्ट्र नायक’ हा आश्वासक प्रकल्प.
भूतकाळातील क़र्तृत्वाच्या पाठीवर उभे राहून वास्तवाचे भान ठेवत नव्या पिढीला नवी क्षितिजे गाठण्यास प्रेरणा देणारा हा प्रकल्प.
महाराष्ट्राला घडवणार्‍या या नायकांची चरित्र संकलित करणारा हा प्रकल्प. या प्रकल्पात १२ खंड असून अंदाजे ५००० चरित्रनायकांची चरित्रे असतील. शालेय विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत सर्वांना हा प्रकल्प मार्गदर्शक राहिल. आपल्या मराठीपणाचा अभिमान असणार्‍या प्रत्येकाच्या घरी, मुखी आणि वाचनात असावा असा हा प्रकल्प. वाचकहो, इंटरनेट या प्रगत माध्यमाद्वारे हा प्रकल्प तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या कर्तृत्वभांडारात आपलाही सहयोग असावा, ही विनंती.

शिल्पकार चरित्र कोश या १२ खंडांच्या प्रकल्पातील
१) इतिहास खंड
२) साहित्य खंड
३) विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण

४) न्यायपालिका, प्रशासन व संरक्षण या खंडांचे प्रकाशन झाले आहे.


आपण हे खंड ऑनलाइन नोंदवू शकता किंवा आमच्या नोंदणी विभागातून कार्यालयांशी संपर्क साधू शकता.

 

मूळ किंमत ९०० रु. सवलतीच्या दरात किंमत रु.७०० फक्त