चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

प्रायोजक आवाहन

नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि तिच्यासमोरचे क्षितिज विस्तारणारा प्रकल्प म्हणजेच ’आधुनिक महाराष्टाची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश’ हा प्रकल्प. मागच्या पिढीच्या खांद्यावर उभे राहूनच नवीन पिढीला स्वप्न पाहता येतात याचे भान राखत या प्रकल्पात गेल्या दोनशे वर्षांचा सर्वंकष परिवर्तनाचा इतिहास दिला आहे.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला आदी अनेक बाबतीत महाराष्ट्राने जी अनुकरणीय उदाहरणे डोळयासमोर ठेवली. लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, स्वा.सावरकर, म. फुले, सावित्रीबाई फुले, जनरलअरूणकुमार वैद्य, बा.शि.मुंजे, छत्रपती शाहू महाराज,कॉम्रेड डांगे, विष्णुषास्त्री चिपळूणकर, संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, केशवसुत, कुसुमाग्रज, डॉ.आंबेडकर, धनंजयराव गाडगीळ, राम गणेश गडकरी, दादासाहेब फाळके अशी कितीतरी नावे आहेत. ती या प्रकल्पाद्वारे 12 खंडांतून जगासमोर ठेवली जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून अभ्यासकांपर्यंत, संशोधकांपर्यंत सर्वांनाच हा प्रकल्प स़मृध्द करेल, असा विश्वास आहे.

आपला इतिहास, आपली पाळेमुळेच आपल्याला स्फूर्ती देतील. महाराष्ट्राला सर्वांगाने घडवणार्‍या नायकांचे कार्य या प्रकल्पातून जगासमोर ठेवले जाईल, महाराष्ट्राने आजपर्यंत देशाच्या विकासात किती मोठा भाग घेतला आहे हे समोर येईल. वाचकहो, हया इतिहासातून स्फूर्ती घेउन देशाला महासत्ता बनवताना महाराष्ट्र पुन्हा एकदा अग्रेसर राहिल अशी आशा वाटते. या विश्वासाला आपण सार्थ ठरवालच.

या प्रकल्पाला महाराष्ट्रातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. निर्माण ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या युवा उद्योजकांनी या प्रकल्पाला प्रमुख प्रायोजकत्व देऊ केले आहे. सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रमांना आधारभूत ठरणारी द्रष्टी सारस्वत बँकही या प्रकल्पासोबत आहे. परिचय ग्रंथाला जे प्रायोजकत्व मिळाले ते याची प्रचिती देणारे आहे.

हा चरित्रकोश महाराष्ट्रातील प्रत्येक छोटया-मोठया वाचनालयात, शाळा-महाविद्यालयात उपलब्ध असावा आणि ज्यांना हा कोश खरेदी करणे शक्य आहे, त्या सर्वांच्या घरी तो असावा. या प्रकल्पाद्वारे मराठी जनांचे कर्तृत्वभांडार खुले होणार आहे. ते खुले करण्यात आपलाही सहभाग असावा ही विनंती.

हा प्रकल्प ग्रंथरुपी आहे. पण आजकाल वाचनसंस्कृती कमी होत आहे असेही म्हटले जाते. खरंतर वाचायला हल्ली खूप काही असतं. त्यामुळे गोंधळूनही काही लोक ग्रंथवाचनाकडे आपणहून वळत नाहीत. यावर उपाय म्हणूनच आम्ही आमचा ग्रंथरूपी प्रकल्प नव्या तंत्रज्ञानाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. वेबसाइटच्या माध्यमातून ग्रंथांमधे काय काय आहे हे आम्ही थोडक्यात सांगणार आहे. कोणकोणते लेखक, तज्ञ मंडळी या ग्रंथारुपी प्रकल्पात समाविष्ट होत आहेत तेही सांगणार आहोत. त्यामुळे वाचकांना ग्रंथनिवडीत हातभार लागेल. थोडक्यात वेबसाइटच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जपलेल्या वाचकांपर्यंत ग्रंथही पोहोचवणार आहोत.

याविशाय वेबसाइटच्या माध्यमातून निरनिराळया विचारधारांचे लेखक, संशोधक, वाचक या प्रकल्पात फोरम आणि ब्लॉग्जच्या माध्यमातून सहभागी होतील. मान्यवर लेखकांचे ब्लॉग वाचायला, आपल्याला प्रतिक्रिया द्यायला सर्व स्तरावरचे वाचक वेबसाइट पाहतील. या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही निरनिराळया स्पर्धा घेणार आहोत. महाविद्यालयांपासून ते खुल्या पातळीवर या स्पर्धा असतील. तसंच नवनवीन उपक्रमांना राबवणार्‍यांना प्रसिध्दीही देणार आहोत. पुरस्कर्तेहो, जगातल्या अशा विविध विचारधारांच्या आणि विविध वयोगटातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याची ही सुवर्णसंधी आहे.