चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

खंड

दृश्यकला

आधुनिक महाराष्ट्राच्या दृश्यकलाविषयक कलापरंपरेचा एकत्रित असा इतिहास उपलब्ध नाही. त्यामुळे १९ व्या शतकापासून सुरु झालेल्या बॉम्बे स्कूल या अतिशय महत्वाच्या कला परंपरेतील अनेक श्रेष्ट चित्र-शिल्पकार आजही अज्ञात आहेत. काहींची नावे ज्ञात असली तरी माहिती उपलब्ध नाही, तर काही विस्मरणात गेले आहेत. त्यामुळेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील आधुनिक कलापरंपरेच्या योगदानाची योग्यप्रकारे दखल घेतली जात नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी काही कलावंत व कला समीक्षक गेली ३-४ वर्षे कार्यरत असून चित्र-शिल्पकार व उपयोजित कलाकारांच्या कलाविषयक योगदानाची यथोचित दखल घेणाऱ्या सुमारे ३०० नोंदींचा अंतर्भाव असणारा कोश लवकरच प्रसिद्ध होत आहे. यातील कलावंतांची निवड करण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व विभागात खास बैठका घेवून त्या भागातील महत्वाच्या कलावंतांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. सदर कोशातील नोंदी महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ उ तरुण कलावंत आणि कलासमीक्षक यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास करून लिहिल्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या अशा या कोशाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तो प्रसिद्ध होईल. या कोशासोबत महाराष्ट्रातील कलासंग्रहालये, विविध संस्था व खाजगी संग्रहातील अप्रसिद्ध व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या अशा कलाकृतींचा एक विशेष रंगीत विभाग या खंडात समाविष्ट करण्यात येणार आहे. शिवाय यातील समाविष्ट कलावंतांची छायाचित्रे न प्रत्येकी एक कलाकृती नोंदीसोबत छापली जाणार आहे. कलावंत, कलारसिक व कलासंस्थासाठी हा दृश्यकला खंड भविष्यात उपयोगी ठरेल.