चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

खंड

इतिहास

महाराष्ट्राला समृध्द परंपरा आणि इतिहास लाभला आहे. असा इतिहास जो कोर्‍या पाटीवर लिहिला गेलेला नाही. कोश प्रकल्पाच्या इतिहास खंडातून हाच इतिहास जिवंत केला जाणार आहे. आपली ओळख आपणाशी करुन देणारा हा आत्मसंवादच आहे. ज्याची ज्ञात सुरुवात झाली आहे गौतमीपुत्र सातकर्णी याच्या सातवाहन घराण्याच्या राजवटीपासून, ज्याने दिला आहे शालिवाहन शक. हाल सातवाहनाच्या गाथासप्तसईपासून लीळाचरित्र, विवेकसिंधू अशी वाटचाल करीत 'इये मर्‍हाटीचिये नगरी' ब्रम्हविद्येचा सुकाळु करणारी संत ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ज्यात अखिल प्राणिमात्रांच्या विश्वकल्याणाचे पसायदान मागितले आहे. पंजाबापर्यंत महाराष्ट्रधर्माची पताका नेणारे संत नामदेव व अवघा महाराष्ट्र पंढरीच्या वाळवंटात समरस करणारे संत तुकाराम, महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा संदेश देणारे संत रामदास ही आपली समृध्द संतपरंपरा.

शिवछत्रपती महाराजांच्यासारख्या युगपुरुषाने साकारलेले डोंगरावर, जमिनीवर तसेच समुद्रात वसवलेले सुमारे दोनशे किल्ले, गडकोटाचे वैभव म्हणजे वास्तुशिल्प, कल्पकता व स्वदेशप्रेमाचे प्रतीकच. याच्याच जोडीला पुरातन शिल्पवैभवाची साक्ष देणारी अजिंठा वेरुळची, खरोसा व पितळखोरा येथील लेणी आणि जुनी महाराष्ट्र दैवतांची मंदिरे. पंढरपूर, बाहुबली, शेगाव, खंडोबा, जोतिबा, अंबाबाई , महालक्ष्मी, गाणगापूर आदी पावन तीर्थक्षेत्रे ... बारापैकी पाच मुख्य ज्योर्तिलिंगे व अष्टविनायक स्थाने...

हा समृध्द वारसा नव्या पिढीकडे सोपविण्यासाठी हा इतिहास खंड. महाराष्ट्र घडविणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांना वाहिलेली कृतज्ञतापूर्वक श्रध्दांजली.

या खंडात प्राचीन महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा व इतिहासाचा परिचय करुन देणार्‍या आकर्षक रंगीत प्रसंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.