चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

खंड

न्यायपालिका, प्रशासन आणि संरक्षण

विद्यमान न्यायदान व्यवस्था ही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. ब्रिटीश राजवटीत असलेले तिचे खानदानीपण विसरून ती लोक न्यायालय रूपाने लोकात मिसळू लागली आहे. आपल्यासमोर येईल तेवढ्याच पुराव्यांवर न्यायदान करण्यची ब्रिटीश परंपरा सोडून लोक हितार्थ जनयाचिकांची छाननी करणे, स्व:ताहून क्रियाशील राहून तिचे याचिकेत रुपांतर करणे अशा घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. लोकही आपल्या अन्यायाच्या प्रतिकरार्थ लोक प्रतिनिधीपेक्षा न्यायालयाच्या उपयोग अधिकाधिक करीत आहोत. या संदर्भात गेल्या १५० वर्षापासून विकसित होत गेलेली न्यायालयीन प्रक्रिया व त्यापूर्वीचा इतिहास यांचा मागोवा या खंडात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या २०० वर्षात या क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले. १९७७ पासून लोक न्यायालयाची व गरिबांना कायदेविषयक सल्ला आणि साहाय्य मोफत देण्याची व्यवस्था सुरु झाली. या कल्पनेला लहान प्रमाणात सुरुवात झाली असली तरी, तिचा विस्तार या शतकाच्या शेवटी, इ.स.२००० मध्ये राम जेठमलानी कायदेमंत्री असताना झाला. हे परिवर्तन, ते घडवणारी न्यायव्यवस्था, कायदे, पुढारी, चळवळी व ते करणारे नेते आणि काम करणारी जनता यांचे हे श्रेय आहे. चरित्र कोशाच्या रचनेमुळे या क्षेत्रात कार्य करणार्याची नावे व कार्य चिरंतन स्मरणात राहण्यास मदत होईल.