चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

खंड

राजकारण

देशभरात परिणाम घडविणार्‍या राजकीय विचारधारांची जन्मभूमी महाराष्ट् ही आहे. कॉंग्रेसमधील जहाल-मवाळ वाद , समाजवादी, साम्यवादी, हिंदुत्ववादी चळवळी, रिपब्लिकन पक्ष, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शिवसेना आणि विविध राजकीय प्रवाहांना चालना देणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा परिचय राजकीय खंडात असणार आहे.
गेल्या दोनशे वर्षांतील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास अनेक घटनांनी प्रभावित झालेला असला, तरी त्याची पुढीलप्रमाणे विभागणी करता येईल
1.) इंग्रजी राजवटीबरोबरच जिल्हा लोकल बोर्ड, ग्रामपंचायती व नगरपालिका यांच्या रुपाने सुसंघटित स्थानिक प्रशासन यंत्रणा उभी राहिली व यात हळूहळू सरकारनियुक्त आणि लोकनियुक्त असा लोकसहभाग वाढू लागला. या सहभागातून हळूहळू राजकीय नेतृत्व उभे होत गेले.
2) जसा इंग्लंडमधल्या लोकांना तिथले सरकार निवडायचा अधिकार आहे, तसाच तो भारतीयांनाही मिळाला पाहिजे, यासाठी राजकीय स्वातंत्र्याचे आंदोलन सुरु झाले, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा इतिहास हा प्रामुख्याने या आंदोलनाचा इतिहास आहे.
3.) सर्व व्यक्ति समान आहेत व त्यांना राजकीय व सामाजिक असे समान हक्क मिळाले पाहिजेत या भूमिकेवरून झालेले अस्मिता जागरण
4.) दलितांना समाजात समान न्यायाची वागणूक मिळावी, या विचारधारेतून सुरू झालेल्या चळवळी.
5.) राजकारण हे केवळ स्वराज्यासाठी नसून आर्थिक आणि औद्योगिक विचारसरणींच्या आधारावर परिवर्तन करण्याचे माध्यम आहे, या विचारप्रणालीतून सुरू झालेल्या राजकीय चळवळी आणि ह्यांतून विविध विचारसरणींचे क्रांतिकारक पक्ष
6.) कॉंग्रेसच्या विविध धोरणांशी सहमत नसलेले पक्ष वा चळवळी
7.) सशस्त्र क्रांतीच्या आधारावर इंग्रजी शासन उलथून टाकण्याचे क्रांतिकारकांचे प्रयत्न
8.) निजामशाहीविरूध्द मराठवाडयात झालेला संघर्ष

या व अशा अनेक मार्गांनी स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय प्रवाह निर्माण झाले.

स्वातंत्र्यपूर्व काळातच तयार झालेली राष्ट्रीय कॉंग्रेस ही संघटना, सत्यशोधक समान, ब‘ब्राम्हणेतर चळवळ, हिंदू महासभेची, तसंच मुस्लीम लीगची स्थापना, अभिनव भारत चळवळ या संस्था चळवळींच्या घडामोडींचे परिणाम राजकीय खंडात आपल्याला दिसतील. या घटनाक‘मांवर आपली छाप उमटणार्‍या चरित्रनायकांची माहिती या खंडात मिळेल.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रमुख राजकीय मतप्रवाह निर्माण झाले.

• कॉंग्रेस व कॉंग्रेसमधून फुटलेले
• शेतकरी कामगार पक्ष
• कम्युनिस्ट व लालनिशाण पक्ष
• शिवसेना

महाराष्ट्रात हे बहुरंगी प्रवाह होते. त्यामुळे महाराष्ट्ाचे राजकारण कधीही एकांगी झाले नाही.
महाराष्ट्रातले राजकारण केवळ निवडणुका जिंकण्यापुरतेच मर्यादित नव्हते, तर राजकीय नेतृत्व आणि आर्थिक विकास यांची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. या सर्वांची चरित्रनायक म्हणून निवड होणार आहे. हा खंड महाराष्ट्रातील राजकीय शिल्पकारांची ओळख घडविणारा व समृद्ध वैचारिक परंपरा आणि विकास या दुहेरी पदरांचे दर्शन घडविणरा असेल.